Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»णेशोत्सवाच्या तोंडावर रोहा–तांबडी रस्ता खड्ड्यात! खड्ड्यांचे विघ्न कायम; प्रशासन सुस्त, जनता त्रस्त अन् नेते आश्वासनांत मस्त!
ताज्या बातम्या

णेशोत्सवाच्या तोंडावर रोहा–तांबडी रस्ता खड्ड्यात! खड्ड्यांचे विघ्न कायम; प्रशासन सुस्त, जनता त्रस्त अन् नेते आश्वासनांत मस्त!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 12, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

गणेशोत्सवाच्या तोंडावर रोहा–तांबडी रस्ता खड्ड्यात!

खड्ड्यांचे विघ्न कायम; प्रशासन सुस्त, जनता त्रस्त अन् नेते आश्वासनांत मस्त!

रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते

गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असताना चाकरमान्यांची गावाकडे ये-जा वाढली आहे. मात्र रोहा तालुक्यातील महत्त्वाचा रोहा–तांबडी मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात अडकला असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी अक्षरशः तारेवरची कसरत ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था प्रशासनाने मान्य करूनही खड्डे बुजविण्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, पुणे तसेच विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल होत आहेत. तांबडी, गौळवाडी, सवाणे, म्हसाडी, बारशेत यासह परिसरातील अनेक गावांचा रोहा शहराशी दैनंदिन संपर्क याच मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
मात्र रस्त्याची अवस्था पाहता ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत गावाकडे निघालेल्या प्रवाशांना वाटेत ‘खड्डा सांभाळा’ म्हणण्याची वेळ आली आहे!
रोहा–तांबडी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर दगड-माती पसरली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
आश्वासनांची मलमपट्टी; खड्डे मात्र जैसे थे!
विशेष म्हणजे, रस्त्याची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. खड्डे बुजविण्याचे आश्वासनही देण्यात आले. राजकीय नेत्यांकडूनही नागरिकांना आश्वासनांची मलमपट्टी करण्यात आली. मात्र आश्वासनांचा पाऊस पडला, तरी रस्त्यावरील खड्डे काही बुजले नाहीत!
यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. “आश्वासनांची आरती नको, प्रत्यक्ष रस्त्यावर काम कधी सुरू करणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर वाहतूक वाढणार हे प्रशासनाला माहीत आहे. चाकरमानी, स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि गणेशभक्तांची मोठी वर्दळ होणार हेही स्पष्ट आहे. तरीही रस्ता दुरुस्तीसाठी विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुर्घटना घडण्याची वाट पाहताय का?
रस्ता खराब आहे, नागरिक त्रस्त आहेत, वाहतूक वाढणार आहे आणि अपघाताचा धोका आहे—या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास असूनही प्रत्यक्ष कामाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
“एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल आता नागरिक थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी रोहा–तांबडी मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेणाऱ्या संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
रस्ता दुरुस्त होणार की आश्वासनांचीच आरती?
गणरायाच्या स्वागतासाठी गावोगावी तयारी सुरू आहे; मात्र रोहा–तांबडी मार्गावरील खड्डे पाहता नागरिकांचा एकच सवाल आहे—
“गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त होणार की यंदाही खड्ड्यांवरूनच बाप्पाचे स्वागत करावे लागणार?”
आता प्रशासन खड्डे बुजवते की पुन्हा आश्वासनांचीच आरती ओवाळते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us