Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»आई एकविरा देवीच्या दरबारी रोहयातुन पाच पदयात्रा रवाना
ताज्या बातम्या

आई एकविरा देवीच्या दरबारी रोहयातुन पाच पदयात्रा रवाना

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

आई एकविरा देवीच्या दरबारी रोहयातुन पाच पदयात्रा रवाना
शेकडो भक्तगणांनी केली कार्ला डोंगराकडे कुच ; बुधवारी आईचा पालखी सोहळा

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

लोणावळा नजिक कार्ला येथे चैत्र महीन्यात साजरा होणाऱ्या आई एकविरा देवीच्या पालखी सोहळयासाठी रोहा येथुन सालाबादप्रमाणे शेकडो भक्तगण पदयात्रा काडुन पायी चालत सोमवारी कार्ला डोंगराकडे निघाले. यंदा रोहा तालुक्यातुन सुमारे सहाशे भक्तगणांनी कार्ला डोंगराकडे कुच केली असुन भल्या पहाटे या पदयात्रा रोहा येथुन मार्गस्थ झाल्या आहेत. बुधवारी 25 मार्चला कार्ले येथील आई एकविरा देवीचा पालखी उत्सव साजरा होणारा आहे.


रोहा शहरातील धनगर आळी मंडळ, रोठखुर्द गावातील जय भवानी मंडळ, झोलांबे येथिल हनुमान सेवा मंडळ, खारापटी येथिल आई एकविरा पालखी पदयात्रा मंडळ आणि निडी येथिल पदयात्रा मंडळाच्या माध्यमातुन चैत्र महीन्यातील कार्ला येथिल आई एकविरा देवीच्या पालखी सोहळयासाठी दरवर्षी शेकडो भक्तगण पदयात्रा काडुन पायी चालत जातात, कार्ला डोंगरावर जाउन आईंच्या चरणी आपली सेवा रूजु करीत असतात. गेली काही वर्ष हे भक्तगण येथुन पालखी सोहळयाच्या दर्शनासाठी पदयात्रा काडुन जात आहेत. यावर्षी पाचही पदयात्रांमध्ये अंदाजे सहाशे भक्त सहभागी झाले आहेत. रविवार पासुनच पदयात्री भक्तांची लगबग सुरू झालेली, रोठखुर्द, खारापटी आणि निडी येथिल पदयात्रेचे रविवारी प्रस्थान झाले तर झोलांबे व धनगर आळी रोहा येथिल पदयात्रा सोमवारी पहाटे येथुन मार्गस्थ झाल्या. साधारण दोन दिवस पायपिट करून ही मंडळी कार्ला गडावर पोहचते. पदयात्रेत भक्ती, भजन, नामस्मरण आदी कार्यक्रम संपन्न होतात. या पदयात्रा आपापल्या पालखीसोबत वाकण, पाली, रासळ ,जांभुळपाडा खोपोली, खंडाळा, लोणावळा, आदी ठिकाणी थांबा घेत एकविरा गडावर पोहचतात. परतीच्या प्रवासात रोहा येथे आल्यानंतर काहींची धाविर महाराजांचे दर्शन घेत पालखीची शहरातून भव्य मिरवणुक काढली जाते, धनगर आळीसह काहीठिकाणी भंडाऱ्याच्या माध्यमातुन भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us