जेष्ठ नागरिकांना सह.पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी केले मार्गदर्शन .
प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे
तळा तालुका जेष्ठ नागरिक संघाची मासिक मिटींगचे आयोजन ३सप्टेंबर २६रोजी श्रीगणेश मंगल कार्यालय दुपारी३वा.भरविण्यातआली होती यावेळी प्रमुख पाहुणे संतोष दराडे सह.पोलीस निरीक्षक तळा पोलीस ठाणे होते व्यासपीठावरअध्यक्ष मंगेश देशमुख,उपाध्यक्ष किशोर पितळे सचिव महंमद परदेशी, सहसचिव रमेश कोलवणकर, खजिनदार दतात्रय कुंडे सल्लागार मारुती शिर्के गुरुजी उपस्थित होते.यावेळी संतोष दराडे यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि शासनाच्या जेष्ठ नागरिकांना सोयी सवलती सुविधा पण भरपूर आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यांनी संघटीत राहिले पाहिजे उदा.जेष्ठ नागरिकांना एसटी बस मधे महीला ५०%व ६५वरील पुरुष वर्गाला ५०%तिकीट ७५वरील नागरिकांना मोफत प्रवास आहे त्याबरोबर दरमहा ठरावीक रक्कम दिली जाते त्याचा लाभ घेतला पाहिजे दिवसेंदिवस सायबर गुन्हा वाढत आहेत नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे मुल नोकरी निमित्ताने बाहेर असतात रिटायर्डमेंट चा पैसा बँकेत सुरक्षित ठेवतो पण गुन्हेगार वेगवेगळी शक्कल वापरून मुलाचा अँक्सीडंट झाला आहे त्याचा मित्रआहे पैशाची गरज आहे. पैसे पाठवा ओटीपी सांगा आपण घाबरून लगेच सांगतो आणी लगेच पैसे बँकखाते खाली होते. सद्या शहरातील माणूस ब्लॉक मध्ये राहून एकल कोंडाझाला आहे शेजारी काय झाले ते समजतनाही.कूरीअर वाला येतो पार्सल आले आहे ओ.टी.पी. मागतो आणी तात्काळ पैसे बँक खाते खाली होते. किंवा मोबाईल हँग केला जातो.पती पत्नी शहरात रहात असतील तर रूम बाहेरील रात्रीचा लाईट चालू ठेवा जेणेकरून रात्री अपरात्री आलेली व्यक्ती समजली जाईल.शेजारच्या संपर्कात रहा. मोबाईल नंबर घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला मदतीला धावून येईल.सकाळी लवकर उठला नाही तर शेजारचा माणूस शेजारधर्म पाळून मदत करील. गुण्या गोविंदाने रहा. तशीच अडचण वाटली तर आजारी पडला मदतीसाठी ११२नंबर डायल करा.पोलीस प्रशासन आपल्या मदतीला धावून येईल.महीला वर्गांनी लग्न समारंभात दागदागिने घालून जावू नका कोणत्याही क्षणी गुन्हेगार कोणत्या तरी बहाण्याने चौकशी करतात किंवा गुंगी चा फवारा किंवा पावडर लावून लुटले जातात या आणी ईतर सुचना देऊन सायबर क्राईम गुन्हेगारी ची काळजी घ्यावी. असे आवाहन करून पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले. अध्यक्ष मंगेश देशमुख यांनीशासनाच्या सोयी सवलती सुविधा चा लाभ घेण्यासाठी संघटना स्थापन केली असून संघटीत रहा जेणेकरून समस्या चे निराकरण करून न्याय मिळवून दिला जाईल.असे मनोगतातून व्यक्त केले.उपाध्यक्ष किशोरपितळे यांनी पोलीस निरीक्षक साहेबाचे आभार व्यक्त करून मागील मिटींगचे इतीवृत्त वाचून मंजूुरी देण्यात आली यावेळी तालुका जेष्ठ नागरिक बंधू भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.