विजय तांबडकर यांचा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सन्मान
प्रतिनिधी / राजीव नेवासेकर
लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने लाखो वारकरी यात्रेकरूंना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना महा आरोग्यवारी -२०२६ ची दखल घेत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या निवडक ७५ उपचारकांना सन्मानित करण्यात आले आहे.यामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आरोग्य उपचारक विजय चंद्रकांत तांबडकर यांना सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने लाखो वारकरी यात्रेकरूंना मोफत आरोग्यसेवा पुरवणाऱ्या “महा आरोग्यवारी २०२६” उपक्रमाची दखल घेत त्याला वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून घोषित केले असून या उपक्रमात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या निवडक ७५ उपचारकांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून सर्टिफिकेट ऑफ हाॅंनर एंड अप्रिसिएशन देऊन गौरविण्यात आले.
आषाढी वारी निमित्ताने दिनांक ७ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत, राज्यातून
२५० हून अधिक प्रशिक्षित थेरोपपिस्टनी या उपक्रमात सहभाग घेऊन वारी मार्गावरील विविध ठिकाणी आणि पंढरपूरमध्ये तब्बल १२०३५४ वारकऱ्यांना निस्वार्थ आरोग्य सेवा प्रदान केली होती.
या अपवादात्मक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेत, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने “महा आरोग्य वारी २०२६” ला अधिकृतपणे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून मान्यता दिली. या उपक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ७५ थेरपिस्टना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून पुणे येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये झालेल्या भव्य सत्कार समारंभात वैयक्तिकरित्या प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
“सेवेतून आरोग्य… आरोग्यसेवेतून मानवता… आणि निस्वार्थ सेवेतून वर्ल्ड रेकॉर्ड!” सन्मान मिळवणारे विजय चंद्रकांत तांबडकर यांच्यावर आप्तेष्ट,नातेवाईक,मित्रपरिवार,चाहत्यांनी कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.