भैरवनाथ महाराज गोरेगाव अखंड सप्ताहाची ३००वर्षाची परंपरा.आजच्या काळात हि जपली आहे.
प्रतिनिधी तळा / किशोर पितळे
गोरेगांवचेग्रामदैवत श्री भैरवी भवानी (भैरवनाथ) चा श्रावण वद्य प्रतिपदा ते अष्टमी अखंड हरिभजन सप्ताह गेली ३०० वर्षापासून सुरू आहे.दैवज्ञ ब्राह्मण (सोनार)समाजातील मुळ पुरुष धंद्या निमित्ताने गोरेगांव येथे सोनार काम करण्यासाठी समुद्र,खाडी, नदी जल मार्गे पायी,बैलगाडी ने आले त्याचे कुलदैवत श्री भैरवी भवानी अर्थात भैरवनाथाचे निस्सीम भक्त असल्याने भक्तासाठी हे त्यांच्या बरोबर आले आणी काही वर्षातच स्वप्नात येऊन दर्शन दिले आणी जो नदी काठी पाषाणी मुर्ती तुला दिसेल ती घेऊन ये.आणी दक्षिणाभिमुख मंदिरात प्रतिष्ठापना कर.मी वेशीवर समस्त भाविकांचे संरक्षण करण्यासाठी रोगराई मुक्त, संकट,इच्छीत मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तांच्या हाकेला धावून येईन असा आशिर्वाद दिला आणी अंतर्धान पावले अशी आख्यायिका आहे.या मंदिरात श्री काळभैरव भवानी जोगेश्वरी,गणपती,शितलामाता,भवानी माता चांदोरकरीणमाता,श्री काळकाई देवी,श्रीसोमजाईदेवी गोंदीरबुवा शिवलिंग नंदी अशा देवता आहेत. श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह पुर्वापार सुरू आहे कालपरत्वे बदल होत गेला असला तरी सद्यस्थितीत सप्ताह समस्त दैवज्ञ समाज दिवस रात्रसतत टाळ वाजवून केला जात आहे. प्रत्येक घराला दिवसरात्र जागर सेवा करण्याची प्रथा निरंतर चालू ठेवली आहे या भैरवनाथा चे मुख्य सालकरी वतनदार हे पोवळे (पोतदार) असून साल पालट दसरा ते दसराअसा वर्षभरातीलविजयादशमीसिमोल्लंगन, चैत्रीचतुर्दशी,पौर्णिमा,लाट,जत्रा,अश्विन प्रतिपदा घटस्थापना ते दसरा,माळ चढवणे वस्त्रालंकार,पुजा,अर्चा,जोगवा मागणे सप्ताह अशा वर्षभरातील देवाचा मानपान असा पारंपरिक पद्धतीने करण्याची प्रथा जबाबदारीने अत्यंत मनोभावे करीत आहेत. नवरात्रात वाडी वस्तीतून मंदिरात भजनाचा जागर केलाजातो.समाजाचा गरबा, गुजराती समाज गरबा खेळला जातो. अठरा पगड जातीचे वतनदार असून पालखीचे भोई होत असतात सर्व जण भक्ती भावाने श्रध्देने साजरे केले जातात.समाजा तील महिलांचा मंगळागौरी, हळदीकुंकू,जागरण समारंभ तसेच श्रावण वद्य सप्तमी अष्टमी ला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करून गोपाळकाला (गोविंदा) व दुसऱ्या दिवशी महाप्रसाद केला जातो भक्ती भावाने मोठ्या उत्साहात सप्ताह सांगता केली जाते.