सातत्यपूर्ण सेवा हाच ‘गरुडझेप’चा ठेवा; नवखार शाळेतील २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
गरुडझेप फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन-पेन्सिल व खाऊचे वाटप
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
“सातत्यपूर्ण सेवा हाच गरुडझेपचा ठेवा” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरुडझेप फाउंडेशनच्या वतीने चणेरा येथील रा.जि.प. शाळा नवखार येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या १७व्या वर्षातही सामाजिक कार्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शाळेतील २५ विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी गरुडझेप फाउंडेशनचे खजिनदार दत्ता साळुंखे, प्रणय मोहिते, सदस्य शंकर मिलगिरे, शिवसेना संपर्कप्रमुख अलिबाग प्रमोद कासकर, शिवसेना विभागप्रमुख मनोज तांडेल, न्हावा शाखाप्रमुख यशवंत झुरे यांच्यासह ग्रामस्थ पांडुरंग भोईर, अंकित भोईर, ज्ञानेश्वर राक्षीकर, काजल भोईर, मनस्वी टावरी, सारिका भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आत्मीयतेने स्वागत केले. गरुडझेप फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गरुडझेप फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार अॅड. केदार अशोक आंब्रे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
दरम्यान, गरुडझेप फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश चंद्रकांत नाडकर्णी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास गरुडझेप फाउंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन दिले.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम म्हणजे केवळ शैक्षणिक साहित्याचे वाटप नसून, ‘शिकावे, पुढे जावे आणि समाजाचे देणे फेडावे’ या सामाजिक जाणिवेची प्रेरणादायी ज्योत प्रज्वलित करणारा उपक्रम ठरला.