देवा फाउंडेशनच्या पहिल्याच आमरण उपोषणाला घवघवीत यश!
*मुरुड आगाराच्या सर्व मागण्या मान्य; मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा डॉ. अनिकेत मेस्त्री यांचा इशारा
प्रतिनिधी / राजीव नेवासेकर
मुरुड आगारातील बससेवा सुरळीत, सुरक्षित व सक्षम करण्यासह मुरुड तालुक्यातील नागरिकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी देवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री* यांनी सहकाऱ्यांसमवेत मुरुड आगारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
मुरुड–पनवेल बससेवेचा विनाथांबा प्रवास, बस मार्गात बंद पडल्यास पर्यायी बसची व्यवस्था, गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला डिझेल पंप पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही, मुरुड आगारात सीएनजी पंप सुरू करण्यासह एकूण २२ मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या होत्या.
या सर्व मागण्यांबाबत *महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले.* त्यामुळे देवा फाउंडेशनच्या पहिल्याच आमरण उपोषणाला यश मिळाले असून, मुरुड आगार प्रमुखांनी ज्यूस देऊन डॉ. अनिकेत मेस्त्री यांचे उपोषण सोडविण्यात आले.
देवा ग्रुप फाऊंडेशन चे डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री यांच्या सोबत देवा ग्रुप फाऊंडेशनअध्यक्ष मनोहर शंकर गुरव,उपाध्यक्ष नरेश वसंत कर्णिक,कार्याध्यक्ष महेश भगत,सचिव रुपेश जामकर,संघटक भावेश शहा नगरसेवक रुपेश रणदिवे , ॲड.रुपेश पाटील, ॲड.कुणाल जैन , नगराध्यक्ष आराधना दांडेकर नगरसेविका प्रीता चौलकर,प्रांजली मकु नगरसेवक मनोज भगत माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर कोळी समाज अध्यक्ष मनोहर मकु अरविंद गायकर युवा नेते कुणाल सतविडकर आदींसह असंख्य प्रवासी वर्गाच्या साक्षीने उपोषणास सुरुवात करण्यात आली .आज उपोषणाचा पहिलाच दिवस असताना एसटी महामंडळाकडून चर्चा करण्यासाठी रामवाडी पेण येथून विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पाटील व मुरुड आगारप्रमुख चिन्मय आंबवकर हे उपस्थित होते .त्यांनी देवा ग्रुप फाऊंडेशन चे डॉ. अनिकेत मेस्त्री व त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व सहकारी यांची भेट घेऊन समस्या निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले .यावर सुरुवातीला अनेक मुद्दयांवर चर्चा सुद्धा संपन्न झाली परंतु उपोषण कर्त्यांनी केलेल्या लिखित मागण्या पैकी मंजूर मागण्या लिखित स्वरूपात देण्याचे सांगितले.मागण्या वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले असले तरी मुरुड आगाराने दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.असा स्पष्ट इशारा डॉ.अनिकेत मेस्त्री यांनी यावेळी दिला.