Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे; पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
ताज्या बातम्या

रोहा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे; पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे; पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रोहा येथील रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले लक्ष्मण मोरे यांची निवड करण्यात आली. क्लबचा ९ वा पदग्रहण सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रमुख पाहुणे पीडीजी डॉ. शैलेश पालेकर यांच्या उपस्थितीत माजी अध्यक्ष विजय दिवेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण मोरे यांना अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. यावेळी सचिवपदी मनोज बोराणा, तर खजिनदारपदी रुपेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून वर्षभर उल्लेखनीय सामाजिक व सेवाभावी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा गौरव करण्यात आला. मावळते अध्यक्ष विजय दिवेकर, २०२५-२६ चे सचिव राकेश कागडा, खजिनदार दिलीप देशमुख तसेच बीओडी सदस्य मयूर दिवेकर, सचिन कदम, दीपक सिंग, रामचंद्र नाकती, रुपेश पाटील, ॲड. मयुरा मोरे, राकेश कर्णैकर, निखिल दाते, ॲड. सौ. पल्लवी दाते आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्या परिवारातील सदस्य, मित्रमंडळ, वरसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश पाटील, विद्यमान सरपंच रामा म्हात्रे, तसेच रोठ गावातील ग्रामस्थ व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या सोहळ्यास रोटरी क्लब महाड, रोटरी क्लब रायगड फोर्ट, रोटरी क्लब ऑफ रोहा आणि रोटरी क्लब ऑफ पेण यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख उपस्थिती लावून लक्ष्मण मोरे यांचे अभिनंदन केले. सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात रोटरी क्लबच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी लक्ष्मण मोरे यांना सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us