Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»नागोठणे पंचक्रोशी सकल हिंदु समाज आयोजित भव्य हिंदु सम्मेलन*
ताज्या बातम्या

नागोठणे पंचक्रोशी सकल हिंदु समाज आयोजित भव्य हिंदु सम्मेलन*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*नागोठणे पंचक्रोशी सकल हिंदु समाज आयोजित भव्य हिंदु सम्मेलन*

प्रतिनिधी-सुदर्शन कोटकर

नागोठणे पंचक्रोशी येथील सकल हिंदु समाज आयोजित विराट हिंदु सम्मेलन धार्मिक आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज सन्माननीय श्री रघुजी राजे आंग्रे आणि थोर इतिहास आणि गडकोट अभ्यासक श्री सुखद जी राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शिव प्रतिमेस व हिंदु देवतांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानज्येष्ठ समाजसेवक श्री विवेक जी रावकर यांनी भूषविले.
मान्यवरांचे स्वागत करून त्यांना श्री गणेश जी राणे यांनी लाइव्ह छायाचित्र काढून भेट देण्यात आल्या.
सुरुवातीस श्री प्रफुल्ल जी नागोठणेकर आणि श्री दामले सर आणि श्री कौस्तुभ जी दिवेकर यांची शिष्या यांनी मिळून गणेश वंदना सादर करण्यात आली.
नागोठणे गावचे सुपुत्र श्री निलेश जी पोटे यांचे चिरंजीव महाराष्ट्र भर नावाजलेले उत्कृष्ट बासरी वादक मास्टर मेघ पोटे यांनी आपल्या सुरेल बासरी वादनाने श्रोत्यांना अक्षरशः जागेवर मंत्रमुग्ध केले.
सन्माननीय अतिथी आणि सर्वच मान्यवर मेघ यांच्या बासरी वादनाने आवाक झाले. एवढ्या लहान वयात त्याला लाभलेली दैवी शक्तीचे सर्वांनी कौतुक केले.
या कार्यक्रमांमध्ये सर्वच क्षेत्रातील हिंदु बांधव उपस्थित होते.
जातीपातीचे भेद विसरून समस्त हिंदु समाज एकत्र यावे ही ह्या संमेलनाचे फलित आहे असे आयोजकांनी सांगितले.
यावेळी हिंदु संस्कृतीतील नृत्याविष्कार कथ्थक नृत्य एका नृत्यांगनेने अप्रतिम सादर केले.
कातळवाडी आणि एकलघर , तळई वाडी तील हिंदु बांधव आणि भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर केले आणि शिवकालीन गुप्तहेर वापरत असलेली टेहळणीची पद्धत म्हणजे काठीवर चालणे ही कला श्री उघडा या बांधवाने अतिशय सुंदर सादर केली. त्याचेही उपस्थित मान्यवर आणि हिंदु बंधु भगिनी साहस पर कौतुक केले.
अंगार आळीतील शिवस्मारकापासून प्रमुख अतिथी मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज सन्माननीय श्री रघुजी राजे आंग्रे यांचे स्वागत वाजत गाजत आणि लेझीम पथकाच्या तालावर करण्यात आले.
यावेळी के एम जी विभागातील मराठा आळीतील श्री संकेत लाड यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची भुमिका साकारली आणि सौ. ऋतु ( निलिमा ) खांडेकर यांनी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची भुमिका साकारली. मेकअप आर्टिस्ट सौ . शितल नांगरे यांनी यासाठी मोलाचे सहकार्य दिले.
श्री मंदार परांजपे सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले आणि सुत्र संचालन श्री केतन नांदगावकर आणि श्री प्रवीण धाडसे आणि श्री प्रमोद नागोठणेकर यांनी केले.


श्री सुखद जी राणे यांनी रायगड जिल्ह्यातील गडकोटांची माहिती दिली. देशातील जवळजवळ सातशे गडकोट मोहिमा सुखद जी राणे यांनी केल्या आहेत . आपल्या आजुबाजूला असलेले गडकोट आणि गड , दुर्ग , टापू, यांची सखोल माहिती दिली. शिव चरित्राविषयी मुख्य अतिथी श्री रघुजी राजे आंग्रे यांनी सुंदर माहिती दिली. मातृशक्तीला पुरातन काळापासून आपल्या हिंदु धर्मात मानाचे स्थान आहे. राजमाता जिजाऊ, ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, समाजाचा रोष पत्करणाऱ्या सावित्री बाई फुले.
यावेळी राजांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या भुमिका साकारलेल्या कलाकारांबरोबर बाळ शिवाजी, राजमाता जिजाऊ, सईबाई राणीसाहेब आणि सावित्री बाई याच्याही भूमिका साकारणाऱ्या बाळ कलाकारांचे कौतुक केलं.
सदर हिंदु संमेलनासाठी नागोठणे शहर व संपुर्ण पंचक्रोशीतील सर्वांचे सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रमांसाठी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी आणि नागोठणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सुप्रिया महाडिक, नागोठणे सर्व ग्रामपंचायत आणि सदस्या ज्योती राऊत, पूनम काळे, उपस्थित होते. समाजातील ज्येष्ठ नागरिक श्री जयराम पवार सर, श्री रामचंद्र परांजपे सर, श्री विजय नागोठणेकर, श्री गोवर्धन भाई पोलसानी, श्री सचिन कळसकर , श्री सुनिल लाड, श्री मधुकर चौलकर, श्री चेतन कामथे, श्री अल्विन नाकटे, श्री भुषण शिर्के, कातळवाडी ग्रामस्थ, एकलघर ग्रामस्थ ( तळई वाडी ) , नागोठणे तीर्थदर्शन ग्रुप, श्री दिपक गायकवाड, श्री सौरभ जांबेकर, श्री अजय भोसले खडक आळी ग्रामस्थ, अंगार आळीतील ग्रामस्थ, श्री जोगेश्वरी माता मंदिर ट्रस्ट आणि उत्सव कमिटी, ग्रामपंचायत नागोठणे , संतसेवा मंडळ, स्वामी समर्थ मठ, सी के पी समाज, प्रसाद डेकोरेटर्स परदेशी कॅटरर्स, आणि अनेक मान्यवर मंडळी , ग्रामस्थ उपस्थित होते, सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. अन्न प्रसाद श्री गोवर्धन भाई पोलसानी यांच्या कडून मिळाले.
सौ. सुप्रिया परदेशी यांनी सुंदर रांगोळी काढल्या. यावेळी तात्यासाहेब टक्के हॉल मध्ये शस्त्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, शिल्प प्रदर्शन ( श्री पारंगे यांच्या शिल्पांचे प्रदर्शन ) , संघाच्या पुस्तकांचे प्रदर्शन श्री धनराज उमाळे यांच्या मार्गदर्शनात उपलब्ध होते. सर्व समाज बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
आयोजक असलेले सर्वच सकल हिंदु समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी अपार मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
आयोजकांकडून पुन्हा एकदा सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले!
सकल हिंदु समाज – नागोठणे!

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us