Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
ताज्या बातम्या

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 14, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोह्याची सुकन्या आणि रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व. प्रफुल्लशेठ बारटके यांची नात, तसेच डॉ. प्रसाद बारटके व डॉ. सौ. पल्लवी बारटके यांची कन्या कु. पावनी प्रसाद बारटके हिने भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अबुधाबी येथील भारतीय दूतावासातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत (Extempore Speech Competition) प्रथम क्रमांक पटकावला आहे.
१२ ते १६ वर्षे वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पावनीसमोर ‘भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध’ हा विषय होता. पावनीने उत्स्फूर्त वक्तृत्व, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि प्रभावी अभिव्यक्तीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले.
पावनीने यापूर्वीही वक्तृत्व, निबंधलेखन, कविता लेखन तसेच विविध साहित्यिक स्पर्धांमध्ये स्पृहणीय यश मिळविले आहे. तिच्या साहित्यिक आणि वक्तृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विविध व्यासपीठांवर तिचा गौरव करण्यात आला आहे.
पावनीचे स्वलिखित ‘Walking with Faith’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, या पुस्तकाला Sharjah International Book Fair येथे Best Seller Book Awardने सन्मानित करण्यात आले आहे. दोन बहिणींच्या पंढरपूर वारीच्या अनुभवावर आधारित या पुस्तकातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा सुंदर परिचय करून देण्यात आला आहे.
नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी UAE मधून बाल विभागासाठी पावनीची निवड करण्यात आली होती. साहित्य, वक्तृत्व आणि सर्जनशील लेखन या विविध क्षेत्रांत ती सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही पावनीने उल्लेखनीय कामगिरी केली असून, नुकत्याच झालेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत तिने ९८.४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तसेच CBSE UAE बोर्डाच्या परीक्षेत आय.टी. विषयात १०० आणि विज्ञान विषयात ९९ गुण मिळवत तिने या विषयांमध्ये सर्वोच्च गुण मिळविले आहेत.
कु. पावनी बारटके ही दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. चंद्रमोहन भांबुरे यांची नात आहे.
पावनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे पालक डॉ. प्रसाद बारटके व डॉ. पल्लवी बारटके तसेच साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us