प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने
मोफत चष्मा वाटप.
कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ कोलाड ही सेवाभावी संस्था गेली पाच ते सहा वर्षापासून कोलाड परिसरात तसेच तळागाळात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण,सह विविध क्षेत्रात उत्तमरित्या कार्य करत असून तर तळागाळातील सर्व सामान्य घटकाला विविध सेवेचा लाभ मिळावा यासाठी सदैव प्रयत्नशील ही सेवाभावी संस्था काम करत असल्याने मागील २९ जुलै रोजी कोलाड लायन्स क्लब, लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग तसेच प्रमोद शेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली तर १५ रुग्णांवर मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तर एका रुग्णांवर प्रमोद शेठ म्हसकर यांच्या विशेष सहकार्यातून तांत्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली असून जवळपास शंभर ते सव्वाशे लाभार्थ्यांना प्रमोद शेठ म्हसकर यांच्या माध्यमातून मोफत चष्मा वाटप करण्यात करण्यात आले.
कोलाड लायन्स क्लब आणि प्रमोदशेठ अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान विद्यमाने तसेच प्रमोदशेठ म्हसकर यांच्यावाढदिवसाचे औचित्य साधून हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या अनुषंगाने दृष्टी तपासणीत आढळून आलेल्या गरजूरुग्णांना रविवारी ९ ऑगस्ट रोजी डॉ.गांधी नर्सिंग होम येथे आयोजित कार्यक्रमा या गरजूंना प्रमोद शेठ म्हसकर यांच्या शुभस्ते या चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
कोलाड लायन्स क्लब आणि त्यांची सर्व टीम अत्यंत तळमळीने सामाजिक बांधिलकीतून उत्तम सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य सह विविध क्षेत्रात काम करत असल्याचा आनंद व्यक्त करत अधिक पुढेही विविध सामाजिक उपक्रम लायन्स क्लब आणि प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून करावी तुमच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही देत कोलाड आंबेवाडी नाका,खांब नाका, सुतारवाडी नाका तसेच विविध परिसरात बाजारपेठ आणि नागरिकांची सततची वर्दळ असते अशा ठीक ठिकाणी स्वच्छालयाची होत असलेली गैर सोय यावरही येत्या काळात अधिकची भर देत यासाठी जागा उपलब्ध होत असेल तर प्रमोद शेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब कोलाड यांच्या माध्यमातून सुलभ स्वच्छालय महिला आणि पुरुष प्रवासी वर्गासाठी उभारण्यासाठी यशस्वीरित्या करण्यासाठी प्रयत्न करावे. येथील बाजार खरेदी करण्यासाठी येणाऱ्या समाज घटकाला या सुविधांचा लाभ मिलेल असे प्रमोद शेठ म्हसकर यांनी सांगत लायन्स क्लब कोलाड आणि येथील रुग्णाच्या मदतीसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तर प्रसंगी कार्यक्रमात लायन नरेश बिरगावले यांनी आजपर्यंत लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तर लायन्स क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांनी सांगितले की येत्या काळात अधिक नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून कोलाड परिसर हा मोती बिंदू मुक्त करण्यासाठी अधिक लायन्स क्लब आणि टीम जोमाने काम करत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रमोद शेठ म्हसकर यांच्या हस्ते शंभरहून अधिक गरजूंना चष्मा वाटप करण्यात आले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, सेक्रेटरी अनिल महाडिक, उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, माजी अध्यक्ष नरेश बिरगावले, लायन गजानन बामणे,अलंकार खांडेकर, भरत महाडिक, विठ्ठल सावळे, राजेंद्रर कोपू,विश्वास निकम, दिलीप मोहिते,डॉ. सपना गांधी सह सर्व लायन मेंबर्स गांधी नर्सिंग होम ची टीम तसेच आदी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रमोद शेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबचे सेक्रेटरी अनिल महाडिक यांनी केले. तसेच प्रसंगी कार्यक्रमात लायन विठ्ठल सावळे यांची सुकन्या कु. श्रुति हीने नीट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याने तिचे कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा प्रमोद शेठ म्हसकर यांनी दिल्या तर शेवटी कार्यक्रमाचे आभार मानून याची सांगता करण्यात आली.