Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»प्रमोद म्हसकर पुरस्कृत ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी; २०० हून अधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग
ताज्या बातम्या

प्रमोद म्हसकर पुरस्कृत ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी; २०० हून अधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

प्रमोद म्हसकर पुरस्कृत ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी; २०० हून अधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

श्री प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान, रोहा यांच्या वतीने आणि रोहा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या आयोजनाखाली मा. श्री प्रमोद शेठ म्हसकर पुरस्कृत U-16 व Open Rapid Chess Tournament–2026 ही भव्य बुद्धिबळ स्पर्धा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी आर. व्ही. फार्म, वरसे-भुवनेश्वर (ता. रोहा, जि. रायगड) येथे उत्साहात पार पडणार आहे.
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, Open व Under-16 या दोन्ही गटांसाठी मिळून २०० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. रायगडसह मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी तसेच राज्यातील विविध भागांतील नामांकित व नवोदित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत Open व Under-16 या प्रमुख गटांबरोबरच सर्वोत्तम महिला, सर्वोत्तम ज्येष्ठ (५५+), रोहा तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडू, Under-16 रोहा तालुका विशेष (मुले व मुली), तसेच Under-9, Under-11 आणि Under-13 वयोगटांसाठी विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहेत. विजेत्यांना एकूण ₹५५ हजारांची रोख पारितोषिके आणि ६० आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेची नोंदणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. उद्घाटन समारंभ सकाळी ९ वाजता, दुपारी १.३० वाजता भोजनाची व्यवस्था, तर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेतील फेऱ्यांची संख्या सहभागी खेळाडूंच्या संख्येनुसार निश्चित केली जाणार आहे.
मा. श्री प्रमोद शेठ म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा रोहा तालुक्यातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक ठरणार असून, बुद्धिबळाचा प्रसार, नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, बुद्धिबळप्रेमी, पालक आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us