Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्यात १२६ व्या वर्षात श्री धावीर नाम सप्ताह; भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम
ताज्या बातम्या

रोह्यात १२६ व्या वर्षात श्री धावीर नाम सप्ताह; भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात १२६ व्या वर्षात श्री धावीर नाम सप्ताह; भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

ब्राह्मण मंडळ, रोहा यांच्या वतीने ओंकारेश्वर मंदिर येथे आयोजित श्री धावीर महाराजांचा वार्षिक नाम सप्ताह ३ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात सुरू असून, यंदा या सप्ताहाने १२६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. शतकाहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या या सप्ताहात दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सन १९०१ मध्ये प्लेगच्या साथीच्या काळात ग्रामस्थांनी धार्मिक उपक्रमांना प्रारंभ केला. त्यानंतर १९०३ पासून ब्राह्मण समाजाने श्री धावीर देवाचा नाम सप्ताह सुरू केला. गेल्या १२५ वर्षांपासून भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची परंपरा जपत हा सप्ताह अखंडपणे सुरू असून, रोहा शहराच्या धार्मिक जीवनात त्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
सप्ताहात दररोज सायंकाळी व्याख्याने, कीर्तन, सांगीतिक मैफिली, भजनसेवा, तसेच महिलांसाठी स्वतंत्र व्याख्याने, भजन आणि योग मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमानंतर पंचपदीचे आयोजन होत असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
सप्ताहाचा समारोप सोमवार, १० ऑगस्ट रोजी होणार असून, सायंकाळी ५ वाजता पारंपरिक छबिना (पालखी सोहळा) मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. या पालखी सोहळ्यास तसेच सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण मंडळ, रोहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us