कुडकुडी गावाचा गोकुळ धाम गवळवाडी नामकरणाचा प्रस्ताव मंजुर..
कुडतुडी गाव यापुढे गोकुळधाम गवळवाडी या नावाने ओळखले जाणार… ग्रामस्थांची अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण..
प्रतिनिधी -श्री.रविंद्र लाड.
म्हसळा: म्हसळा तालुक्यातील काही गावांची नावे जातीनिहाय देण्यात आली होती, पण ९ ऑक्टो २०२५ च्या पत्रान्वये अनेक ग्रामीण भागातील जातीवाचक नावे बदलण्याचा सर्वस्वी अधिकार जिल्हा अधिकारी यांना असून त्या अनुशंगाने परिपत्रक काढण्यात आले असुन २७ /३ / २०२६ अन्वये रायगड जिल्हयातील ९६ वाड्या वस्तींची जुनी जातीवाचक नावे बदलुन ग्रामसभेत ठरावात प्रस्तावित केलेल्या नविन नावांचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याच प्ररिपत्रकाच्या अनुशंगाने मौजे कुडकुडी गावचे उपसरपंच कृष्णा दिवेकर, अध्यक्ष विठोबा कासार, शंकर मिरगळ, मोहन दिवेकर यांनी कुडतुडी गावाचे नाव बदलण्या बाबतचा निवेदन देण्यात आला होता, अखेर सततच्या पाठपुराव्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून कुडतुडी गवळवाडी वरून गोकुळधाम नामकरण करण्यात आल्या बाबतचे परिपत्रक एप्रिल महिन्यातच म्हसळा पंचायत समितीकडे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत मध्ये सदर नामकरणाचा ठराव घेऊन संबंधित विभागाला पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असुन कुडकुडी हे गाव या पुढे गोकुळधाम नावाने ओळखले जाणार.. कुडतुडी गावाप्रमाणे अनेक गावांची जातीवाचक नावे बदलली जाणार.