*म्हसळा तालुक्यातील मौजै कुडतुडी गांवचे नामंतरण “गोकुळ धाम”गवळवाडी असे झाले*.
*प्रतिनिधी -श्री.रविंद्र लाड*.
*मौजे कुडतुडी गावचे उपसरपंच श्री. कृष्णा दिवेकर अध्यक्ष श्री. विठोबा कासार श्री. शंकर मिरगळआणि *श्री. मोहन दिवेकरहे आपल्या गावाच्या नाव बदलाच्या संदर्भात अलिबाग जिल्हा परिषद येथे सातत्यानं पाठपुराव्यामुळे अखेर शाशन मान्यता मीळाली *”कुडतुडी गौळवाडी” वरून”कुडतुडी गोकुळधाम” करण्यात आल्याबाबतचे पत्र एप्रिल महिन्यातच पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहे*
*आता पुढील प्रक्रिया म्हणून *ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो सर्व संबंधित शासकीय विभागांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व शासकीय पत्रव्यवहारात “कुडतुडी गौळवाडी” ऐवजी *”कुडतुडी गोकुळधाम”हेच नाव अधिकृतपणे वापरण्यात येईल*.
*महसुली गाव करण्यासंदर्भातील आवश्यक शासन निर्णय (GR) देखील खाली जोडला आहे*.
*खरोखरच आज गावातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून गावाचे नाव “गोकुळधाम”गवळवाडी व्हावे, अशी अनेक ग्रामस्थांची इच्छा होती. त्या इच्छेला आज यश मिळाले आहे. यासाठी ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केले आणि सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार ग्रामस्थांनी मानले आहे*
*आजही आपल्या गावातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ ग्रामस्थ स्वतःची तब्येत सांभाळत या कामासाठी धावपळ करत आहेत. त्यांच्या समर्पणाचे आणि गावाप्रती असलेल्या प्रेमाचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे*.
*आता पुढील महत्त्वाचे ध्येय म्हणजे गोकुळधाम गवळवाडी महसुली गावाचा दर्जा मिळवून देणे.त्यासाठी KG Boyआणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांचे असेच सहकार्य करावे असे आवाहनही श्री दिनेश कासार व तरुणांनी केले आहे*
*शाशनाच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये फारच उत्साहाचे वातावरण पाहायला मीळत आहे*