Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»श्रीक्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे वृक्षारोपण
ताज्या बातम्या

श्रीक्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे वृक्षारोपण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्रीक्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे वृक्षारोपण .

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड खांब विभागातील सामाजिक युवा नेते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमोद शेठ म्हसकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथील भगवान शंकर मंदिर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

समाजहिताची जाणीव ठेवून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणारे प्रमोद अनंत म्हसकर हे समाजसेवेत नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. पर्यावरण संवर्धन,कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य सामाजिक बांधिलकी, गरजूंसाठी मदतीचा हात आणि लोकहिताचे उपक्रम यामधून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणतेही सामाजिक कार्य असो, त्यामध्ये ते नेहमी पुढाकार घेतात. त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना प्रेरणा मिळत असून समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि तळमळ त्याबद्दल सर्वांकडून कौतुकास पात्र ठरत आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्रसंगी यावेळी अनिल कोल्हटकर, अनंता मरवडे, राजेंद्र मरवडे, शशिकांत मरवडे, रमेश कोल्हटकर, भिमेश बामणे, प्रज्योत मरवडे, सुशील मरोडे, केतन बामणे, पंढरीनाथ बामणे, अमित गायकर, गणेश जाधव, प्रशांत नागावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी प्रमोद अनंत म्हसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आणि भविष्यातही त्यांच्या हातून असेच समाजोपयोगी उपक्रम सातत्याने घडत राहावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us