Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*GCC-TBC २०२७ प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थी व पालकांनी सावध राहावे*
ताज्या बातम्या

*GCC-TBC २०२७ प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थी व पालकांनी सावध राहावे*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*GCC-TBC २०२७ प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थी व पालकांनी सावध राहावे*

रोहा, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मान्यतेने घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र (GCC-TBC) २०२७ परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश घेऊन परीक्षा अर्ज (Exam Form) दिलेल्या वेळेत भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. परीक्षेचा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना LMS वर मोफत सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, मोबाईल Attendance बंधनकारक राहणार आहे.

सध्या महाराष्ट्रातील विविध शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनेक भरती प्रक्रियांमध्ये GCC-TBC इंग्रजी ३०/४० शब्द प्रति मिनिट व मराठी ३० शब्द प्रति मिनिट या टंकलेखन पात्रतेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे सरकारी सेवेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करणे आवश्यक आहे.

कॉम्प्युटर-टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था रायगड (रजि.) या रायगड जिल्हा संघटनेच्या वतीने विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, GCC-TBC ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अधिकृत संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा आहे. कोणत्याही खाजगी संस्थेचे टायपिंग प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र आणि GCC-TBC हे समान समजू नये. विविध भरती जाहिरातींमध्ये कोणते टंकलेखन प्रमाणपत्र ग्राह्य धरले आहे, याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा.

विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता शासन मान्यताप्राप्त टायपिंग संस्थेत वेळेत प्रवेश घ्यावा, परीक्षा अर्ज भरावा आणि नियमित सराव करून यशाची तयारी करावी, असे आवाहन रोहा-दमखाडी येथील सदर रायगड जिल्हा संघटनेचे सचिव राजेश श्रीवर्धनकर यांचे वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us