Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळे येथे नामदार नाना शंकरशेट १६१वी पुण्यस्मरण सोहळा उत्साहात; संस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार
ताज्या बातम्या

तळे येथे नामदार नाना शंकरशेट १६१वी पुण्यस्मरण सोहळा उत्साहात; संस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

* तळे येथे नामदार नाना शंकरशेट १६१वी पुण्यस्मरण सोहळा उत्साहात; संस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार*

तळा -किशोर पितळे

श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट, दैवज्ञ ब्राह्मण समाज, तळे यांच्या वतीने *मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व गुणवंत विद्यार्थी गौरव सन्मान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक ३१/०७/२०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी नामदार नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी नानांच्या समाजोपयोगी, शैक्षणिक व संस्कृतप्रेमी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांना विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना *”नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती” प्रदान करण्यात आली. यामध्ये कु. निर्जला चेतन कीर्तने, कु. स्वरा प्रकाश गायकवाड आणि कु.तेजस्विनी सुशील तिवारी या विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.*या वेळी दैवज्ञ ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ समाजबांधव * गणेश विष्णू वेदक (गणेशभाऊ) यांच्या ९० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*कार्यक्रमात किशोर गणेश वेदक, नंदकुमार द्वारकानाथ वेदक आणि प्रकाश गायकवाड* यांनी आपल्या मनोगतातून नामदार नाना शंकरशेट यांच्या महान कार्याच्या परिचय करून इतीहासाचे पाने उलगडून उजाळादिला.
*अध्यक्षीय समारोप भाषणात सुहास कमळाकर वावेकर यांनी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन* करीत भविष्यातही अशाच प्रकारे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गणेशभाऊ यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
*कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महिला मंडळाच्या सचिव मितल सुहास वावेकर यांनी केले.* कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव हर्षद दिलीप वेदक, खजिनदार राजेश नारायण वेदक, तसेच समाजातील सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ समाजबांधव व महिला भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.*नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीच्या *रोख रकमेचे सौजन्य संजय वसंत वेदक, तर *सन्मानचिन्ह व गौरवपत्राचे सौजन्य कमळाकर वावेकर यांचे होते.*याशिवाय तळे मराठी शाळेत नाना शंकरशेट पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटपकरण्यासाठी पत्रकार किशोर पितळे, तसेच विद्यार्थ्यांना पेन वाटपासाठी खजिनदार राजेश वेदक यांचेही विशेष सहकार्य लाभले.*
समाजातील शैक्षणिक परंपरेला बळ देणारा, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आणि ज्येष्ठांचा सन्मान करणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us