कु.स्वरा प्रकाश गायकवाड
“नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती”ने सन्मानित.
प्रतिनिधी /किशोर पितळे
भिमकन्या कु.स्वरा प्रकाश गायकवाड हिने एस्.एस्.सी माध्यमिक शालांत परीक्षेत संस्कृत भाषेत ८६%गुण प्राप्त केले असून दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे तर्फे मुंबईचे आद्य शिल्पकार समाज भुषण कै.नामदार नाना शंकरशेठ यांच्या १६१व्या पुण्यस्मरण च्या निमित्ताने३१जुलै रोजी श्री लक्ष्मी नारायण मंदिरात सन्मानचिन्ह, गौरवपत्र व रोख रक्कम देऊन उपस्थितसमाज बांधवाच्या हस्ते गौरविण्यात आले. गो.म.वेदक विद्यामंदिर तळे येथे प्रथमच संस्कृत भाषा विषय सक्तीचा व ऐश्चिक करण्यात आला होता तरी देखील या भिम कन्येने संस्कृत विषयाची निवड करून ८६%गुण विशेष प्रविण्य प्राप्त केले.संस्कृत विषयावर लक्ष केंद्रित करून धेय्य साध्य केले आहे.हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे.कै.नाना शकंरशेठ हे संस्कृत विषय प्रेमी असल्याने त्यांच्या नावांने शिष्यवृत्ती दिली जाते व समाजाच्या वतीने देखील बहुजन समाजातील विद्यार्थी संस्कृत भाषेत प्रथम क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थाला अ.भा. दै.स.प.वतीने सन्मानित केले जाते.याचाच एक भाग म्हणून श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट,दैवज्ञ ब्राह्मण समाज,तळे यांच्या वतीने संस्कृत भाषेत विशेष गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेऊन संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन,समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते.ही भाषा हिंदू,बौद्ध आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा वैदिक
भाषेचा मान आहे हि भाषा संस्कृती जपली जावी हा यामागचा उदात्त हेतू आहे यापुढे देखील सन्मान दिला जाणार आहे.स्वराने प्राप्त केलेले यश वाखाणण्याजोगी आहे तीने संस्कृत विषयात पि एच डी (डॉक्टरेट आँफ फिलोसाँफी) करावी हि काळाची गरज आहे.असे मनोगतात अध्यक्ष सुहास वावेकर यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.या समारंभाला समाजबांधव भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम चे सुत्रसंचालन मितल वावेकर यांनी केले.