प्राथमिक शाळा तळेगाव येथे मोठ्या उत्साहात आदराने गुरुपौर्णिमा साजरी.
तळा -किशोर पितळे
गुरु ब्रम्हा गुरु विष्णु : गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरूवे नम ..मानवी जीवनात गुरुला अनन्य साधारण महत्व आहे.प्रथम गुरु ईश्वर (गर्भावस्थेतील)पहिला गुरु माता -पिता, दुसरा गुरू गुरुजंन,आपल्या घडवले ते गुरू,तिसरा गुरुलहानांपासून थोरांपर्यंत ज्यांच्या कडून शिकलो ते गुरू ,संत महंतांना पण गुरू करावा गुरु शिवाय ज्ञान नाही.आम्हांला पण गुरु करावा लागला म्हणूनच तुम्ही आमचे शिष्य झालात गुरु शिष्याचे नाते जीवनात टिकून ठेवले पाहिजे या गुरुच्या ऋणातून उतराई होण्याचा आणी कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरूपौणीमा आषाढ पौर्णिमा अर्थात व्यासपुजा साजरी केली जाते.संस्कार संस्कृती जपली जावी भावी पिढीला ज्ञात व्हावी हा उदात्त हेतूने प्राथमिक मराठी शाळा तळेगाव येथे साजरी करण्यात येते असे विजय येलवे सर यांनी प्रारंभी सांगितले.तसेच यावेळी सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी गुरुंना नम्रपणे वंदन करून जीवनातील गुरु बद्दल असणारी आत्मियता दिलेले ज्ञान ही ज्ञानाची शिदोरी आणी संस्कार संस्कृती जपून ठेवून जीवनात बदल करीत असतो. आमच्या गुरूजनांना वंदन करून चरणी नतमस्तक होऊन गुरूपौणीमा साजरी केली असे विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी मुख्याध्यापिका स्मृती शिंदे, विजय येलवे रेखा अकोलकर तुषार वाडेकर उपस्थित होते.