Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करीत समाजात ऐक्य, प्रेरणा आणि देशभक्तीची भावना जपली गेली पाहिजे. –मंत्री भरतशेठ गोगावले .
ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करीत समाजात ऐक्य, प्रेरणा आणि देशभक्तीची भावना जपली गेली पाहिजे. –मंत्री भरतशेठ गोगावले .

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करीत समाजात ऐक्य, प्रेरणा आणि देशभक्तीची भावना जपली गेली पाहिजे. –मंत्री भरतशेठ गोगावले .

तळा-किशोर पितळे–दि. १९ मार्च २०२६ रोजी मराठी नववर्षाचे औचित्य साधत माणगाव तालुक्यातील गोरेगांवमधील संत रोहिदास गर्जना मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा नूतनीकरण लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात नामदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती पार पडला. या सोहळ्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक १९९५ साली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर यांच्या कारकिर्दीत उभे करण्यात आले होते. या स्मारकास ३० वर्षे उलटल्याने संत रोहिदास गर्जना परिवाराने सदर स्मारकाचे नुतनीकरण करण्याचा विचार केला गेला आणि त्या विचारांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि या जुन्या स्मारकाचे नुतनीकरण करित अखेर काल दि. १९ मार्च २०२६ रोजी मराठी नुतनवर्षाच्या मुहुर्तावर मोठया जल्लोषात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.यासोहळ्याची सुरुवात सर्व प्रथम मा. ना. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी दिप प्रज्वलन केले राकेश गोरेगांवकर यांनी प्रस्तावना सादर करित मा. ना. भरतशेठ गोगावले यांच्या सह उपस्थित सर्व मान्यनरांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसाद गोरेगावकर यांनी भूषविले.त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमशिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत समाजात ऐक्य, प्रेरणा आणि देशभक्तीची भावना जपण्याचे आवाहन फलोत्पादन रोजगार.खारभूमी.मंत्री भरत शेठ गोगावले यांनीकेले.
आहे संत रोहिदास गर्जना मंडळाच्या परिवाराच्या वतीने अध्यक्ष प्रसाद गोरेगावकर यांच्यासह आदित्य गोरेगांवकर, ओमकार गोरेगावकर,राकेश गोरेगावकर, गिरीश गोरेगांवकर,नरेद्र गोरेगांवकर,रोशनगोरेगांवकर, किरण गोरेगांवकर, ओम गोरेगांवकर, परेश पाबरेकर, विजय आंबेतकर, श्रवण गोरेगांवकर सह मंडळातील सर्वच सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच मार्गदर्शक म्हणून मंगेश गोरेगावकर, सत्यवान गोरेगावकर, दिलीप गोरेगावकर आणि राजेंद्र गोरेगावकर, महादेव आंबेतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.स्मारकाच्या नूतनीकरणामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले असूननागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.कार्यक्रमाचा शेवटी सर्व उपस्थिताचे आभार प्रदर्शनाने करण्यात आला.या कार्यक्रमास सरपंच जुबेर अब्बासी,उपसरपंच चंद्रकांत गोरेगांवकर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी हरवंडकर, पंचायत समित सदस्य स्वाती ताई करकरे, रविदादा टेंबे, ज्ञानदेव पद्रत, तसेच बापुसाहेब सोनगिरे, विकास दादा गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us