Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»घरेलू कामगार संघाच्या वतीने कामगार मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या बातम्या

घरेलू कामगार संघाच्या वतीने कामगार मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 27, 2026Updated:July 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

घरेलू कामगार संघाच्या वतीने कामगार मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी /समीर बामुगडे

रोहा दि. 26 : घरेलू कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, जिल्हा रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कामगार मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. घरेलू कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात 85 घरेलू कामगार आणि 68 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात घरेलू कामगारांच्या 68 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सक्षम नागरिक घडविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कु. वनश्री शेडगे, नगराध्यक्षा, रोहा नगरपालिका उपस्थित होत्या. त्यांनी घरेलू कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असा प्रेरणादायी संदेश दिला.

या उपक्रमासाठी श्री महेश वाडकर, विभाग प्रमुख, धाटाव, नवनिर्माण सेना, महाराष्ट्र राज्य यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी श्रीमती निर्मला भूतकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, घरेलू कामगार संघ (भारतीय मजदूर संघ), श्री अशोकजी निकम, रायगड जिल्हा सचिव, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते अजित तलाठी, विकास सुतार, शुभांगी बाकडे, भारती आंग्रे, रश्मी खांडेकर, राजश्री धिडे, नलिनी भोसले, चेतन देशमुख आणि मनोज शेडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख प्रकाश कोळी तसेच सिंधांत भूतकर यांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी घरेलू कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांना समाजाचा अधिकाधिक पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आयोजकांनी घरेलू कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपस्थितांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत भारतीय मजदूर संघ व घरेलू कामगार संघाच्या समाजहिताच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us