मांदाड ते खाजणीच्या ब्रिज रस्त्याची दुरावस्था.ठेकेदाराचे दुर्लक्ष.अपघाताची शक्यता.
तळा-नझीर पठाण
इंदापूर दिघी आगरदांडा रस्त्यावरील मांदाड खाजणी फाटा रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की खड्ड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे अशी परिस्थिती आसून डपक्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून अनेक प्रवासी, पर्यटक पर्यटनासाठी मुरूड,अलिबागकडे जात असतात या रस्त्यावरून आगरदांडा बंदराकडे मोठे ट्रक खाजगी गाड्या ची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मोठे मोठ्या खड्डामुळे साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही.गाडीचालतअसताना हेलकावे मिळत आहेत त्याबरोबर मोटार सायकल स्वारांना जीव मुठीत धरून चालवावे लागते. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागै होणार का?या ठेकेदारांनी मलमपट्टी करूनच
काम केले असल्याचे दिसून येत आहे. टेंडर च्या अटी शर्ती प्रमाणे काम न करता घाईघाईने काम केले आहेअसे म्हटले जात आहे.ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जनतेची व वाहन चालकांकडून केली जात आहे