Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»बांधकाम कामगार महासंघातर्फे *भारतीय मजदूर संघा च्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त* कामगार आनंद मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या बातम्या

बांधकाम कामगार महासंघातर्फे *भारतीय मजदूर संघा च्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त* कामगार आनंद मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 20, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

बांधकाम कामगार महासंघातर्फे *भारतीय मजदूर संघा च्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त* कामगार आनंद मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

रोहा:समीर बामुगडे
१९ जुलै २०२६ : बांधकाम कामगार महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, जिल्हा रायगड यांच्या वतीने भारतीय मजदुर संघा च्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आनंद मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री विरेश्वर मंदिर हॉल, महाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास बांधकाम कामगार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. हरी चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय सचिव मा. श्री. Adv अनिलजी ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. श्री. किरणजी मिलगिर, केंद्रीय सदस्य मा. श्री. श्रीपाद कुटासकर, सुतार समाजाचे अध्यक्ष मा. श्री. जयराम सुतार तसेच भारतीय मजदूर संघाचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. रमेश गोविलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, बांधकाम कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध विषयांवर कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध ठरावांना एकमताने अनुमोदन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रायगड जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. विकास सुतार, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा सचिव मा. श्री. अशोक निकम, रायगड जिल्हा बांधकाम कामगार संघाचे सचिव मा. श्री. संतोष सुतार, उपाध्यक्ष मा. श्री. अंकित सुतार, कोषाध्यक्ष मा. श्री. शैलेश पिंपळकर, संघटन मंत्री मा. श्री. नामदेव सुतार तसेच मा. श्री. राकेश सुतार, मा. श्री. संदीप सुतार, मा. कु. वृषाली सुतार, मा. श्री. नारायण सुतार, मा. सौ. कांचन वगुळे आणि मा. श्री. विनोद कांबळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन आणि नियोजन उत्तम प्रकारे पार पडल्याने उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us